सलग चार वर्षे शाळेसाठी भरीव योगदान; अरविंद संपत खोत सहपरिवार यांचा सत्कार
Also Read: कराड : जिल्हा परिषद शाळा विठोबाचीवाडीच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी श्री. अरविंद संपत खोत सहपरिवार यांनी सलग चार वर्षे विविध […]
कराड : जिल्हा परिषद शाळा विठोबाचीवाडीच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी श्री. अरविंद संपत खोत सहपरिवार यांनी सलग चार वर्षे विविध स्वरूपात आर्थिक व साहित्यिक स्वरूपाचे भरीव सहकार्य केले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री. खोत यांनी २०२३-२४ मध्ये विद्यार्थ्यांसाठी पेरू वृक्ष वाटपासाठी ₹४,५००, २०२४-२५ मध्ये डिजिटल पाट्या वाटपासाठी ₹५,०००, २०२५-२६ मध्ये लोजिम व ढोल साहित्याकरिता ₹६,०००, तर २०२६-२७ मध्ये शाळेच्या लॉनच्या विकासासाठी ₹१५,००० असे योगदान दिले. अशा प्रकारे चार वर्षांत त्यांनी एकूण ₹३०,५०० रुपयांचे विशेष सहकार्य केले आहे.
विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या कलागुणांना व क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन मिळावे तसेच शाळेचा परिसर हिरवाईने व सुंदर वातावरणाने नटावा, या उद्देशाने खोत कुटुंबीयांनी केलेले हे कार्य निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.
या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक योगदानाची दखल घेत जिल्हा परिषद शाळा विठोबाचीवाडीच्या वतीने अरविंद संपत खोत सहपरिवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालकांच्या वतीने त्यांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
शाळेच्या विकासासाठी सलग चार वर्षे मदतीचा हात देणाऱ्या अरविंद संपत खोत सहपरिवार यांच्या उपक्रमातून समाजाने शाळांच्या विकासासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळत आहे.