धारावीच्या प्रलंबित पुनर्विकासाला ‘विशेष प्रकल्प दर्जा’ची मान्यता, मंत्रिमंडळाचा निर्णय

2
338

पुढील सात वर्षांत धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मुंबई- राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे धारावीच्या पुनर्विकासाला ‘विशेष प्रकल्प दर्जा’ची मान्यता देण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा प्रलंबित होता.
धारावीचा एकत्रित पुनर्विकास करण्यात येणार असून त्यासाठी जागतिक पातळीवर टेंडर मागवण्यात येईल. जागतिक निविदा प्रक्रियेद्वारे अंमलबजावणी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पुढील सात वर्षांत धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुनर्वसन प्रकल्पासाठी 22 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी रेल्वेकडून 90 एकर जमीन घेण्याचा प्रस्ताव आहे. निविदा प्राप्त करणारे खासगी ठेकेदार आणि शासन यांच्यात 80-20 टक्के तत्वावर गुंतवणूक करण्यात येणार आहे.
किमान 350 स्क्वेअर फुटाचे घर मिळणार…
धारावीत 104 हेक्टर भूखंडावर सुमारे 59 हजार 160 तळमजली सरंचना आहेत. या संरचनांवर दोन किंवा तीन मजल्यांची बांधकामे आहेत. धारावीत एकूण 12 हजार 976 औद्योगिक आणि व्यावसायिक गाळे आहेत. पुनर्विकास प्रकल्पात कमीत कमी 350 स्क्वेअर फुटाचे घर मिळणार आहे. 405 स्क्वेअर फूट आणि 500 स्क्वेअर फुटापेक्षा मोठे गाळे असणाऱ्यांना आहेत, तेवढे 500 स्क्वेअर फूट अधिक 35 टक्के फंजीबल देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

संपर्क- भीमराव धुळप (9221117684)
side_add

2 COMMENTS

 1. I’m not that much of a online reader to be honest but your sites really nice, keep it up!
  I’ll go ahead and bookmark your site to come back down the road.
  Cheers

 2. Nice post. I was checking constantly this blog and I am impressed!
  Very helpful information specially the ultimate section 🙂 I take care of such info much.
  I used to be seeking this certain information for a long time.
  Thank you and best of luck.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here