राज्याच्या वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले धारावी महोत्सवाचे उदघाटन

राज्याच्या वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले धारावी महोत्सवाचे उदघाटन
राज्याच्या वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले धारावी महोत्सवाचे उदघाटन

प्रतिनिधी - धारावीच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पार्टी, धारावी विधानसभा आणि मुंबई सचिव श्रीमती दिव्याताई ढोले यांच्या वतीने "धारावी महोत्सव" आयोजित करण्यात आला आहे त्यांचे उदघाटन काल रात्री उशिरा महाराष्ट्र राज्याचे वित्त,नियोजन आणि वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले सदर महोत्सव 9 जानेवारी ते 20 जानेवारी 2019 या दरम्यान धारावी पंपिंग स्टेशनच्या मैदानात भव्य दिव्य आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावर  सुरू राहणार आहे.

उदघाटना नंतर वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी धारावीतील जनतेला शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर दिव्या ढोले यांनी केलेल्या धारावीतील कामाबाबत त्यांचे कौतुक करून त्यांनी डी अक्षराचा अर्थ सांगितला डी म्हणजे धारावी आणि डी म्हणजे दिव्या तर यावेळी तुम्ही या आमच्या दिव्याताई ला निवडून द्या जे गेले अनेक वर्षे आमदार आहेत त्यांच्यापेक्षा १० पटीने दिव्याने लोकांची कामे केली आहेत असे महोत्सव भरवून लांब पल्ल्याचा प्रवास करून कुटुंबियाला फिरायला घेऊन जाण्यापेक्षा तुमच्या घराजवळच म्हणजे धारावीतच प्रथमच तुम्हाला आनंद देण्याचे काम केलं आहे. त्यामुळे यापुढे त्या तुम्हाला आनंद देतीलच पण तुमचे भेडसावणारे प्रश्न मार्गी लावतील असे शेवटी बोलले.या महोत्सवात विविध प्रकारचे मुलांसाठी खेळाचे प्रकार,मराठी- हिंदी सांस्कृतिक कार्यक्रम,जादूचे प्रयोग,महिलांसाठी होम मिनिस्टर,तसेच कव्वाली, मुशहरा, खाद्य पदार्थाचे स्टॉल, बघायला आणि मौजमस्ती करण्यासाठी आहेत.

या कार्यक्रमाला भाजपा मीडिया प्रमुख ओमप्रकाश चौहान,जिल्हा उपाध्यक्ष रमाकांत गुप्ता,महासचिव उदय नांदे,असगर शेख,संतोष शर्मा,झोपडपट्टी सेलचे मुन्नालाल भारद्वाज,संतोषलाल यादव,संजय गुप्ता,रिझवान पटेल,नेहल वारीस,विनायक लिंगायत,युवा मोर्चाचे दीपक सिंग,महिला आघाडीच्या अर्चना पवार,आरती भोसले आदी उपस्थित होते.