पंतप्रधान मोदींनी शिवसेनाप्रमुखांना ट्विटवरून वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान मोदींनी शिवसेनाप्रमुखांना ट्विटवरून वाहिली श्रद्धांजली

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९३ वी जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्य आणि देशातील अन्य मान्यवरांनी सुध्दया  जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण केली आहे.

मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘धाडसी बाळासाहेबांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण, लोकांचे हक्क मिळवून देण्यासाठीचा बाळासाहेबांचा निर्धार पक्का होता. त्यांना प्रखर बुध्दिमता लाभली होती. त्यांच्या वक्तृत्वाने लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले’, असे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे.