पै.तानाजी चवरे (आप्पा) यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य "प्रवक्ते" पदी निवड

पै.तानाजी चवरे (आप्पा) यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य "प्रवक्ते" पदी निवड

प्रतिनिधी - कराड तालुक्यातील साळशीरंबे गावचे सुपुत्र, कुस्ती मल्लविद्या महासंघाचे स्थापनेपासूनचे सहकारी .पै.तानाजी चवरे (आप्पा) यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ प्रवक्ते पदी निवड करण्यात येत आली आहे.

पै.तानाजी चवरे यांनी कराड तालुका कुस्ती संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना   स्व.पै.संजय पाटील यांच्या निधनानंतर कराड व पाटण तालुका  पंचक्रोशीत बंद पडत चाललेली कुस्ती मैदाने   पुन्हा सुरू करण्यात चवरे आप्पांचा वाटा सिंहाचा आहे. कराड तालुक्याबरोबर च पाटण तालुक्यात   आप्पांच्या मार्गदर्शना खाली अनेक  काटा जोड मैदाने  पार पडतात    बसल्या जाग्यावर १०० काटा कुस्ता जोडण्याची किमया असणारे  कुशल कुस्ती संघटक म्हणून  पै.तानाजी चवरे (आप्पा) यांची ओळख  आहे    
अनेक कुस्ती मैदानात स्वतः उपस्थित राहून पैलवानांचे मनोधैर्य ते वाढवत असतात व मैदानात  येणाऱ्या  आजी-माजी पैलवान ,वस्ताद मंडळींचा  मानसन्मान  करत असतात  
कुंडल अपघातग्रस्त मल्लांच्या कुटुंबियाठी सुद्धा त्यांनी आर्थिक मदत उभी करण्यासाठी आपले योगदान दिले.
उत्कृष्ट संघटक म्हणून त्यांची ख्याती आहे.कुस्तीविषयी तळमळ असणारे अनेक तळमळीचे शिलेदार त्यांच्या संपर्कात आहेत.कुस्तीसाठी निस्वार्थ काम करणाऱ्या अवलीयांचे ते मुक्त कंठाने गौरव करतात,त्यामध्ये काडीमात्र स्वार्थाचा लवलेश नसतो. म्हणूनच  कुस्ती मल्लविध्धा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष  पै.गणेश मानुगडे व त्यांच्या  सर्व  सहकार्यांनी   त्यांची                प्रवक्ते पदी निवड केली  त्यांच्या  निवडीचे  कराड ,शिराळा ,वाळवा  पाटण  ,शाहुवाडी  तालुक्यातून   पैलवान मिञांच्याकडुन  कौतुक  होत आहे व अभिनंदन करण्यात येत आहे 
कुस्तीसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातही आप्पांची कारकीर्द दिसमासाने वाढत आहे.  महाराष्ट्राभर  फार मोठा मिञ परिवार  असणारे   मिञांच्या  विषयी मनामध्ये नेहमीच मिञप्रेम असणारे पै.तानाजी चवरे (आप्पा)- साळशिरंबे  ता. कराड ही त्यांची जन्मभूमी  त्यांच्या या कुस्ती वर असलेल्या प्रेमापोटी त्यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे.