तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली

0
7

तुकाराम मुंढे यांची अखेर मुंबईत बदली झाली आहे. त्यांची नियुक्ती मंत्रालयात करण्यात आली आहे. नियोजन विभागाच्या सहसचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आयुक्तपदाची सूत्रे सोपवून मंत्रालयातील नियोजन विभागातील सहसचिव पदाची जबाबदारी स्वीकारवी, असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.

प्रतिनिधि म.टा – तुकाराम मुंढे यांची अखेर मुंबईत बदली झाली आहे. त्यांची नियुक्ती मंत्रालयात करण्यात आली आहे. नियोजन विभागाच्या सहसचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आयुक्तपदाची सूत्रे सोपवून मंत्रालयातील नियोजन विभागातील सहसचिव पदाची जबाबदारी स्वीकारवी, असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.

नाशिकचे आयुक्त असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळं लोकप्रतिनिधी आणि मुंढे यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला होता. अखेर मुंढे यांची बदली करण्यात आली. याविरोधात नाशिककर रस्त्यावर उतरले असतानाच, मुंढेंची बदली मुंबईमध्ये करण्यात आली आहे. नियोजन विभागाच्या सहसचिवपदी नियुक्ती केल्याचं पत्र मुंढेंना देण्यात आलं. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवून आपण नियुक्तीच्या ठिकाणी रुजू व्हावं, असे आदेश या पत्रात देण्यात आलं आहेत.

याआधी पुणे पालिका परिवहन सेवेच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून बदली होऊन त्यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, तिथेही त्यांनी आपली धडाकेबाज कामगिरी सुरूच ठेवली. त्यामुळं सत्ताधारी आणि मुंढेंमध्ये संघर्ष टोकाला पोहोचला होता.

 

 

संपर्क- भीमराव धुळप (9221117684)
side_add

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here