मी हॅकर नाही, तपास यंत्रणा नाही, मी गोपीनाथरावांची एक कन्या आहे पंकजा मुंडे

मी हॅकर नाही, तपास यंत्रणा नाही, मी गोपीनाथरावांची एक कन्या आहे पंकजा मुंडे

मुंबई : दोन दिवसांपूर्वी लंडन येथे एक आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद घेत आंतरराष्ट्रीय हॅकर सय्यद शुजाने २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम हॅक केल्याचा दावा केला होता.यात विशेष म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंगबद्दल सर्व माहिती असल्यामुळे पक्षातील नेत्यांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप या हॅकरने केला होता.यामुळे,देशासह राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

याच पार्श्वभूमीवर आज गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मौन सोडत या प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.पंकजा मुंडे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या की,मला व माझ्या कुटुंबास अशा गोष्टींमुळे मानसिक त्रासातून सामोरे जावे लागत आहे.गोपीनाथ मुंडे साहेबांच्या निधनानंतर मी स्वत:हा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे CBI चौकशीची मागणी केली होती.

ती चौकशी पूर्ण देखील झाली आहे.त्यामुळे,या प्रकरणाची दखल देशातली मोठी लोकं घेतील.या विषयाचे राजकीय भांडवल करणारी मी राजकारणी नाही.मी हॅकर नाही, तपास यंत्रणा नाही,तर मी एक कन्या आहे, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी या प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.