शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे गणेशपूजन संपन्न

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे गणेशपूजन संपन्न

प्रतिनिधी - मुंबईतील शिवाजी पार्क येथील महापौर निवास येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारकक्सक उभारले जाणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येथे गणेशपूजन करण्यात आले. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आरती केली. यावेळी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकासाठी राज्य सरकारने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून हा निधी देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाने घेतला. त्यानंतर आज महापौर निवासात गणेश पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

दरम्यान, याआधी आज सकाळी मुंबईचे महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांनी देखील महापौर निवासस्थानी पूजन केले.