परदेशी व्यक्तीकडून दान यात्रेतून मिळणारा निधी आदिवासी शाळांना देणगी

0
3

प्रतिनिधी – न्यूझीलंडमधील सामाजिक चळवळींना आर्थिक हातभार लावणारे तसेच “दान यात्रा” काढण्यासाठी प्रसिद्ध असणारे माईक बटलर आणि डेरिल पर्सी तसेच महाराष्ट्रातून न्यूझीलंड मध्ये वास्तव्य करणारे पंकज आंबवणे हे आपल्या आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील शाळांना मदत करण्यासाठी जवळपास 570 किलोमीटर चालणार आहेत. 3 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान मुंबई ते पुणे, पुणे ते नाशिक आणि नाशिक ते वाडा अशी ही #ज्ञानदान_यात्रा चालणार आहे.या दान यात्रेचा शुभारंभ सोमवार दि 3 डिसेंबर ला मुंबई चे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे त्यांच्या महापौर बंगल्यावरून हिरवा कंदील दाखवणार आहेत.

सुरुवातीला हे पंकज आंबनावे व माईक बटलर हे या दान यात्रेला सुरुवात करणार असून ते मुंबई पुणे संगमनेर नाशिक व तेथून इगतपुरी मार्गे शहापूर,वाडा जव्हार,पालघर असा दौरा करणार आहेत त्यांना दि 10 डिसेंबर पासून त्यांच्यासोबत न्यूझीलंड चे डेरील पर्शि सहभागी होणार आहेत त्यांनी चालायला सुरुवात करण्याअगोदर त्यांना ऑनलाईन मदतीचा ओघ सुरू झाला आहे ते चालताना सुद्धा अनेक लोक त्यांना मदत करणार असल्याचे आयोजन समितीकडून सांगण्यात आले तसेच येथून मिळणार सर्व निधी हा त्या आदिवासी पाड्यातील शाळांना लागणाऱ्या शिक्षणाविषयी वस्तू,आणि इतर गोष्टीसाठी वापरण्यात येणार आहे. या पत्रकार परिषद मध्ये या दान यात्रेच्या मदतीची सुरुवात धगधगती मुंबई चे संपादक यांनी छोटीशी आर्थिक मदत करून केली

संपर्क- भीमराव धुळप (9221117684)
side_add

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here