धारावी महिला शिवीगाळ प्रकरण,भाजपा मंडल अध्यक्षाला पदावरून हटवले

0
89

प्रतिनिधी – धारावी मध्ये गेले चार दिवस राजकीय वातावरण तापले होते भाजपा मुंबई सचिव दिव्या ढोले यांना धारावी मंडल अध्यक्ष मणी बालन यांनी अर्वाच्य भाषेत लज्जास्पद अशी शिवीगाळ केली होती,त्यांची अडिओ क्लिप मिळाल्यानंतर श्रीमती दिव्या ढोले यांनी प्रथम वरिष्ठ नेत्यांना पत्रव्यवहार करून माहिती दिली परंतु लवकर दाखल न घेतल्याने धारावीतील महिला पदाधिकारी यांनच्या आग्रहाखातर धारावी पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार नोंद केली तेव्हा धारावी मंडल अधक्ष्यावर कलम ५०० व ५०९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला
त्यानंतर धारावितील महिलांना याबाबतची माहिती मिळाली त्यावेळी त्यांनी धारावी मंडल अधक्ष्यावर दलित महिलेला शिवीगाळ केली व धमकी दिल्याच्या कारणावरून मोर्चा काडून त्याच्याविरुद्ध अट्रोसिटी कायद्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली त्या मागणीचे निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश पाटील यांच्याकडे दिले याची माहिती वरिष्ठ नेत्यांना समजताच श्रीमती दिव्या ढोले यांना चर्चेसाठी बोलावून सर्व माहिती घेतली व तीन सदस्यांची समिती बनवून रीतसर धारावी मंडल अध्यक्ष मणी बालन याला पदावरून हटवण्यात आल्याचे पत्र मुंबई अध्यक्ष यांनी श्रीमती दिव्या ढोले याना पाठवण्यात आले.

संपर्क- भीमराव धुळप (9221117684)
side_add

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here