धारावीच्या कार्यसम्राट आमदार वर्षाताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेली खास मुलाखत "वाढदिवस विशेषांक" वर्षाताई...जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.....!

धारावीच्या कार्यसम्राट आमदार वर्षाताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेली खास मुलाखत "वाढदिवस विशेषांक" वर्षाताई...जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.....!

धारावीच्या ताई,वर्षाताई गायकवाड

कुटुंबात जे ताईला स्थान आहे ते स्थान आज धारावीमध्ये आमदार वर्षाताई गायकवाड यांनी आपल्या कृतृत्वाने निर्माण केले आहे. ताई जशी कुटुंबाची काळजी घेतात तशीच आपल्या मतदारसंघात प्रत्येक कुटूंबाची घेतात. म्हणून विरोधकामध्ये सुद्धा त्यांच्याविषयी आदराची भावना आहे.आणि म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितच चौथ्यांदा प्रचंड मतांनी वर्षाताई विजयी होतील. यात तिळमात्र शंका नाही.
धारावीच्या विद्यमान आमदार सध्या तिस-यांदा आमदार म्हणून विभागात कार्यरत असलेल्या वर्षा गायकवाड एक लोकप्रिय राजकारणी म्हणून विभागात प्रसिद्ध आहेत. पेशाने प्राध्यापक असलेल्या वर्षा गायकवाड यांना बालपणापासूनच कुटुंबात राजकारणाचे बाळकडू मिळाले. वर्षा यांची वेगळी ओळख म्हणजे त्या कॉंग्रेसचे नेते तथा माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. वर्षा यांचा राजकारणातील प्रवेश हा पुर्वनियोजीत असल्याचे वर्षा सांगतात. मला प्राध्यापक म्हणून काम करणे जितके आवडत असे तितकेच समाजकारण करण्यात देखील मला रस होता. २००४ साली कॉंग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना धारावीमधून निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. पक्षासाठी त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या निस्वार्थ कामामुळे पक्षश्रेष्ठींनी हा विश्वास दाखविला होता. वडिलांचे काम उत्तम असल्याचा वर्षा यांना काही अंशी फायदा झाला आणि २००४ साली त्या पहिल्यांदा धारावी विधानसभेतून आमदार म्हणून निवडूण आल्या. आज तिस-यांदा त्या विभागातील आमदार म्हणून कार्यरत आहेत. वडिलांचा प्रचार करत पक्षात एक कार्यकर्त्या म्हणून काम करणा-या वर्षा यांना आपल्या कार्यकाळात जनतेसाठी काम कसे करावे यासाठी विषेश प्रशिक्षण घ्यावे लागले नाही. वडिलांसोबत काम करताना पक्षाने आपल्याला आमदार म्हणून निवडणुक लढविण्याची संधी दिली नाही तर आपण पक्षात एक पक्षाशी एकनिष्ठ असलेली कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा निश्चय त्यांनी मनाशी घट्ट केला होता. गेली १५ वर्षे वर्षा गायकवाड यांनी विभागात अनेक वेगवेगळी कामे केली आहेत. १५ वर्षाच्या आपल्या आपल्या कार्यकाळात आपण जनतेसाठी काय केले आणि काय काम करणे बाकी आहे यावर वर्षा गायकवाड यांनी साप्ताहीक धगधगती मुंबईशी केलेली ही खास बातचीत.

राजकीय क्षेत्रातील तुमची वाटचाल आणि त्यामध्ये वडिलांचा असलेला सहभाग याविषयी काय सांगाल ?

माझे राजकीय क्षेत्रातील पदार्पण हा कोणताही योगा योग नाही. वडील राजकारणात असल्यामुळे कॉंग्रेस पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून मी विभागातील कामांमध्ये नेहमीच सक्रीय होते. लोकांशी संवाद साधणे समस्या जाणून घेणे हे माझ्या आवडीचे विषय होते. कालांतराणे मी काम करत गेल्यामुळे लोकांमध्ये लोकप्रिय झाले. २००४ ला पक्षाने संधी दिल्यामुळे विभागात काम करण्यासाठी जनतेने संधी दिली. त्या संधीचे सोने करत गेली १५ वर्षे मी आमदार म्हणून कार्यरत आहे. हे सर्व जनतेच्या विश्वासामुळे शक्य झाले आहे. विषय जेव्हा वडिलांच्या राजकारणात असल्याने काय फायदा झाला असा निर्माण होतो तेव्हा साहजिकच कुठेतरी वडिलांच्या नावाचा मला फायदा झाला पण काम मात्र मलाच करावे लागले. २००४ साली जेव्हा पक्ष संधी देणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा वडिलांनी स्पष्ट सांगितले होते. जर पक्षाने संधी दिली नाही तरीही कार्यकर्ते म्हणून एकनिष्ठ रहा. तुमचे काम उत्तम आहे त्यामुळे एक दिवस संधी जरुर मिळेल. माझ्या कामाचे श्रेय मला पक्षाने दिले त्यामुळे मला जनतेसाठी पुन्हा काम करण्याची संधी मिळाली.

राजकीय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर आलेले अनुभव...

वडील राजकीय व्यक्ती असल्यामुळे अनेकदा वडीलांशी लोक माझी तुलना करत असत त्यामुळे मला प्रत्येकवेळी जोमाने काम करावे लागले. त्यामुळे या क्षेत्रात कामातून मला स्वताची प्रतिमा निर्माण करावी लागली. अशा वेळी मला वडिलांसोबत केलेल्या कामाचा अनुभव कामी आला नवनवीन अनुभव घेता आले. राजकारणात मला आलेला महत्वाचा अनुभव म्हणजे राजकारण हे वाईट आहे असे अनेकांच्या तोंडून ऐकले होते पण राजकारण हे विकासाचे राजकारण असले पाहीजे समाजातील गरजवंतांसाठी राजकारण करुन विकास साधता आला पाहिले लोकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला तर राजकारण, समाजकारण आणि विकास साधणे सहज शक्य आहे. मलाही अनेकांनी राजकारण म्हणजे कपट, शडयंत्र असे सांगितले पण मी विकासाचे राजकारण करायला लागल्यानंतर मला राजकारणाचा अर्थ समजला. पण राजकारणात आल्यानंतर मला समजले प्राध्यापक म्हणून मी जे लोकांसाठी करु शकले नसते ते आमदार होऊन करु शकले. कॉंग्रेस सत्तेत असताना मी महिला व बालविकास मंत्री होते त्यावेळी देखील समाजातील तळागाळातील महिलांसाठी काम केले. त्यामुळे अगदी झोपडपट्टीत असलेल्या महिलांच्या समस्या मला जाणून घेता आ्ल्या. मी समाजातल्या अशा वर्गासाठी काम केले जे मुख्यप्रवाहात नव्हते. पक्ष श्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास ठेवला याचा निश्चितच आनंद आहे. त्यामुळे हे अनुभव घेता आले त्याचबरोबर जनतेने विश्वास ठेवला म्हणून मी काम करु शकले.

राजकारणात शैक्षणिक पात्रता कीती महत्वाची असते असे वाटते ?

राजकारणातील पदार्पणासाठी किमान शिक्षण असणे गरजेचे आहे. परंतु आज राजकीय क्षेत्रात शिक्षणाशिवाय अनुभवातून देखील उत्तम निर्णय घेता येऊ शकतात याचे विषेश उदाहरण म्हणजे माझे वडील एकनाथ गायकवाड. माझ्या वडिलांचे शिक्षण फार झाले नाही परंतु त्यांनी माझ्यापेक्षा अधिक चांगले निर्णय त्यांनी घेतली. त्यामुळे शिक्षणावरुन कुणाला ग्रृहीत धरणे योग्य नाही. पुर्वीच्या काळी सहकार क्षेत्रात अनेकांनी क्रांतीकारी निर्णय घेतले ते सर्वच वेल एज्युकेटेड होते असे नाही. ते सर्वच कॉमर्सचे ग्रुज्युएट नव्हते पण त्यांना सहकार क्षेत्रातील उत्तम ज्ञान होते कारण त्यांनी प्रॅक्टीकल काम केले होते. आयुष्यात सर्वच पुस्तकी ज्ञान प्रॅक्टीकल आयुष्यात कामी येते असे नाही. माझ्या दृष्टीने अनुभवाचे ज्ञान हे कोणत्याही विद्यापीठात फी भरुन मिळत नाही.

धारावीची आमदार झाल्यानंतर धारावीतील सर्वसामान्य किंवा गरीब जनतेच्या समस्या काय आहेत  हे कोणत्याही पुस्तकात लिहलेले नाही. याचा अभ्यास करुन समस्या सोडविण्यासाठी मला स्वताला धारावीत फिरुन लोकांशी आपुलकीने संवाद साधावा लागला. महिलांसाठी काम करताना त्यांची काम करण्याची क्षमता त्यांची माणसिकता हे अनुभवातून  शिकावे लागले. शिक्षणामुळे नक्कीच काम करण्यासाठी एक दिशा मिळते आपण जे काम करणार आहोत त्या योजना आखण्यासाठी शिक्षणाचा विषेश फायदा होतो. नवनवीन आयडीया सत्यात उतरविण्यासाठी शिक्षणामुळे मदत होते. शिक्षणाला अनुभवाची जोड मिळाली तर काम करणे सोपे होते. जगातील अनेक देश योग्य आखणीमुळे अनेक क्षेत्रात यशस्वी होऊ शकले आहेत. शिक्षणासोबत तुम्ही जमिनीशी तितकेच जोडलेले रहा. मेलबर्न चे स्पोर्ट ग्राउंड बघुन मला आपल्याकडेही अशा खेळासाठी वेगळ्या सोई सुविधा असायला हवे असे वाटले होते. त्यामुळे माझ्या मतदार संघात मी खेळाला विषेश प्राधान्य देऊन  खेळाचे मैदान बनविने योग्य समजले. माझ्या शिक्षणासोबत मला हा अनुभव देखील कामी आला हे ही तितकेच सत्य आहे.

राजकारणातील आठवणीत राहीलेले अनुभव ?

तृतीयपंथी आणि वैश्या व्यवसाय करणा-या महिला यांच्या समस्या राजकारणात आल्यानंतर समाजकारण करताना प्रामुख्याने मला समजल्या. ज्या महिला वैश्या व्यवसाय करतात अशा महिलांना जेव्हा एखादे मुल होते तेव्हा त्या मुलाचा पिता कोण हा प्रश्न निर्माण होतो. त्या मुलाला कुणाचे नाव देणार हा प्रश्न असायचा मी माझ्या कार्यकाळात वडील नाही तर आईचे नाव राशन कार्डवर घेऊन त्या मुलांना शाळेत प्रवेश मिळावा यासाठी मी प्रयत्न केला. मी एका तृतीयपंथींच्या कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी कार्यक्रमात प्रचंड शांतता नियमांचे पालन झालेले पहायला मिळाले. इतर कार्यक्रमात नियम कितीही केले तर त्याचे पालन होत नाही या कार्यक्रमात लोकांनी केलेले नियमांचे पालक शांततेत कार्यक्रम हे पाहूण त्यांच्याविषयीचा आदर मनात वाढत गेला.

गेल्या १५ वर्षांत धारावीत झालेल्या बदलांविषयी जाणून घ्यायला आवडेल !

धारावीच्या जनतेने मला आमदार होण्याची संधी दिली त्यांच्या आशिर्वादाने मला मंत्री देखील होता आले. जेव्हा मंत्री होते तेव्हाही मी जे जे प्रोजेक्ट हाती घेतले त्याच्या माध्यमातून निधी आणण्याचा प्रयत्न केला. लोकउपयोगी कामे करण्याचा प्रयत्न केला. मी राज्यमंत्री असताना माझ्याकडे पर्यटन विभाग होता त्याच्या माध्यमातून डब्ल्यू आयटी पार्कसाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी मी आणण्याचे काम केले. जेव्हा हायर आणि टेक्निकल विभाग होता तेव्हा त्याच्या माध्यमातून मी गव्हर्मेंट आयटीआय आणण्याचा प्रयत्न केला. हा १९ करोड रुपयांचा प्रोजेक्ट होता. एम एम आर डी एच्या माध्यमातून स्पोर्टस कॉम्पेक्स बांधले त्यासाठी २३ कोटीचा खर्च आला. त्यामध्ये इंडोअर आणि आऊट डोअर गेम आदींचा समावेश आहे. आंतराराष्ट्रीय दर्जाचे हे स्पोर्ट कॉंम्पेक्स आहे. 
धारावीमध्ये स्कायवॉक देखील आणला. त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्र्यांकडून ४० करोड रुपयांचा निधी त्या स्कायवॉकसाठी मी मंजूर करुन आणला होता. धारावीत शैक्षणिक जनजागृती बरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळालाही प्राधान्य दिले. धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असल्यामुळे या ठिकाणी अनेक वेगवेगळे लघु उद्योग असल्याचे पहायला मिळते. या लघु उद्योगांना चालना मिळावी यासाठी मी प्रयत्न केले. धारावीचे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर पुर्वी धारावी ही गल्लीच्छ वस्ती म्हणून ओळखली जात असे त्या धारावीत स्वच्छतेसाठी उपक्रम राबविले.

महिला आणि बालविकास मंत्री असताना धारावीतील महिलांसाठी केलेल्या कामांविषयी जाणून घ्यायला आवडेल

महिलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम, प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काम देणे अशा प्रकारची अनेक कामे त्यावेळी केली. विविध उपक्रमाच्या माध्यमातून धारावीतील महिलांना रोजगार निर्मिती करुन दिली. वर्षा गायकवाडचा चेहरा पाहिला तर वर्षा गायकवाडला हा चेहराच धारावीने मला दिला आहे. धारावीकरांची मी आभारी आहे धारावीकरांनी मला ही संधी दिली. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून धारावीत अनेक विकासकामे मी माझ्या कार्यकाळात करण्याचा प्रयत्न केला. धारावी ही गलीच्छ वस्ती म्हणून ओळखली जायची ती धारावी आज बदलत आहे. धारावीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत देखील गेल्या १५ वर्षांत प्रचंड फरक झालेला पहायला मिळतो. दिवसेंदिस लघु उद्योगाच्या बाबतीत धारावी अग्रेसर होत असल्याचे पहायला मिळते. तरुणांना रोजगार निर्मीतीवर देखील आम्ही तितकाच भर दिला.

राज्यात आगामी काळात कॉंग्रेसचे सरकार सत्तेत आले तर कोणत्या पदावर काम करायला आवडेल ?

मी आणि माझे कुटुंबीय कॉंग्रेस पक्षाशी आणि गांधी घराण्याशी प्रचंड एकनिष्ठ आहोत. त्यामुळे मला पक्षाने यापुढे कोणतेही पद दिले नाही तर आम्ही पक्षात झाडू मारु परंतु माझ्या वडीलांनी सांगितल्याप्रमाणे मी गेली १५ वर्षे कॉंग्रेसची आमदार आणि त्यापुर्वी कॉंग्रेसची कार्यकर्ती म्हणून कार्यरत होते मी सामान्य कार्यकर्ते म्हणून काम करेन पण पक्षाशी एकनिष्ठ राहीन. मला गांधी परिवाराने आणि कॉंग्रेस पक्षाने प्रचंड संधी दिल्या आहेत. विविध पदांवर काम करण्याचा अनुभव लोकांच्या भेटी गाठी समस्या जाणून घेण्याचे योगायोग पक्षामुळे मला लाभले. पक्षश्रेष्ठींच्या प्रेमामुळे आशिर्वादामुळे लाभले त्यामुळे कोणतेही पद मिळाले नाही तरीही पक्षात निरपेक्ष काम करेन पक्षाशी बंडखोरी करणार नाही.

कॉंग्रेसमुळे मला सत्तेत असताना राज्यात महिला आणि बालविकास मंत्री म्हणून काम करता आले. मी सत्तेत असताना चोख  आणि उत्तम काम केले आहे. १५ वर्षाच्या कार्यकाळात मी धारावीच्या जनतेसाठी १०० टक्के काम करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांनी साथ दिली म्हणून १५ वर्षे आमदार होऊ शकले. यापुढे जनतेप्रमाणे पक्षाकडून जी संधी जे पद दिले जाईल त्यावर मी निस्वार्थपणे काम करेन. मला राजकारण नाही तर समाजकारण करायला आवडेल.