आचरेकर सरांचे ते एकले असते तर मी घडलो नसतो : सचिन तेंडुलकर

आचरेकर सरांचे ते एकले असते तर मी घडलो नसतो : सचिन तेंडुलकर

मुंबई :

सचिन तेंडुलकरसह दिग्गज खेळाडू घडवणाऱ्या रमाकांत आचरेकर यांचे नुकतेच निधन झाले. सचिनने आचरेकर सरांच्या आठवणींना उजाळा देताना महत्त्वाचे प्रसंग आणि आठवणी सांगितल्या. तसेच मी जो काही आहे, जो घडलोय ते फक्त आचरेकर सरांमुळेच असे म्हणत सचिनने गुरूंना आदरांजली वाहिली. 

"मी देशासाठी २४ वर्षे फलंदाजी करू शकलो त्यामागे फक्त आचरेकर सर होते. त्यांनीच सचिन घडवला. कोचिंग करणे म्हणजे केवळ बदल करणे नाही, हे आचरेकर सरांनी लक्षात ठेवूनच कोचिंग केले. त्यामुळेच मी चांगला खेळाडू होऊ शकलो," असे सचिन म्हणाला. 

यावेळी बोलताना सचिनने आपल्या जीवनातील आचरेकर सरांच्या सोबतचा एक प्रसंग सांगितला. "मी बॅटचे हँडल खालच्या बाजूने धरत होतो. सरांनी ते पाहिले आणि मला ग्रीप वर धरायला सांगितली. मी ग्रीप वर धरून खेळू लागलो. मात्र सरांना हवा तसा खेळ होत नव्हता. मग त्यांनी मला बोलावून घेतले. माझ्याशी चर्चा केली आणि मला पूर्वीच्या ग्रीपनेच खेळायला सांगितले," असे सचिन म्हणाला. तसेच जर त्यावेळी ग्रीप बदलली असती तर मी चांगला फलंदाज होऊ शकलो नसतो, असेही सचिन म्हणाला.